Maratha reservation agitation : जालन्याच्या आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण (Maratha reservation agitation)आंदोलनातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेनंतर पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते घटनास्थळी भेटी देत आहेत. ठीकठिकाणी या घटनेनिषेधार्थ आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलण्यात आला आहे.
जालना लाठीचार्जच्या मागे ‘शासन आपल्या दारी’चे कनेक्शन; ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर मोठा आरोप
‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलला…
8 सप्टेंबरला जालन्यात ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ होणार होता मात्र आता मराठा आरक्षण आंदोलन (Maratha reservation agitation) चिघळल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान या अगोदर देखील हा जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ दोनदा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन चिघळल्यामुळे तिसऱ्यांदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
Maratha Andolan : लाठीमाराचा संताप! सरपंचाने जाळली स्वतःची नवी कोरी कार
या अगोदर 25 जून आणि 18 ऑगस्टला जालन्यात ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ होणार होता. त्यासाठी केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पाडली होती. तेव्हा ही हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
नेमकं काय घडलं होतं ?
मराठा आरक्षण (Maratha reservation agitation) व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
या आंदोलनाची (Maratha reservation agitation) दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.