Maratha Andolan : लाठीमाराचा संताप! सरपंचाने जाळली स्वतःची नवी कोरी कार

Maratha Andolan : लाठीमाराचा संताप! सरपंचाने जाळली स्वतःची नवी कोरी कार

Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तर एक वर्ष आधीच घेतलेली चारचाकी कार पेटवून देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. फुलंब्री येथील पाल फाटा येथे त्यांनी चारचाकी त्यांचे वाहन पेटवून दिले.

आमच्या लोकांवर जर हल्ला होणार असेल तर आम्ही शांत राहणार नाही. आता स्वतःची गाडी जाळली पुढे आम्ही स्वतःला जाळून घेऊन निषेध व्यक्त करू, अशी उद्विग्न प्रतिक्रिया साबळे यांनी यावळी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

Uddhav Thackeray : “मला देशाचा नेता व्हायचं नाही”; पंतप्रधानपदाच्या रेसमधून ठाकरेंची माघार

काय आहे प्रकरण ?

सरसकट ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंबड व गेवराई तालुक्याती 123 गावांनी मंगळवारी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी राज्य सरकारने ठोस आश्वासन दिले नव्हते. या कारणामुळे जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी आंदोलनस्थळी झाली होती. त्यानंतर मात्र येथे लाठीमाराची घटना घडली. पोलिसांच्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले.

इंडिया बैठकीवरील लक्ष हटविण्यासाठी लाठीहल्ला

यामागे राजकीय सुसूत्रता आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती. देशातील मोठे नेते हजर होते. चर्चा सुरू होती. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या बैठकीवरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी हा लाठीहल्ला करण्यात आला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.  मराठा समाजाचे आधीही मोर्चे निघाले. पण त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले नाहीत. अशा वेळी जाणीवपूर्वक लाठीमार करून राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. त्या माध्यमातून मुंबईतील बैठकीवरून लोकांचं लक्ष हटवायचं त्यासाठी सरकारने सुनियोजितपणे केलेला हा लाठीहल्ला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube