महानगरपालिकांच्या निकालांचा रणसंग्राम; पाहा मराठवाड्यात A टू Z अपडेट

आजच्या मराठवाड्यातील सर्व महानगरपालिकांचा निकाल पाहा अपडेट लेट्सअप मराठीवर. कुणाच्या बाजूने आहे जनतेचा कौल.

  • Written By: Published:
News Photo (1)

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Result Live 2026 : गेल्या ३ ते ४ वर्षांपासून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महानगरपालिका या प्रशासनाच्या भरवश्यावर चालू होत्या. शहरांमधल्या नागरिकांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या प्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता. पालिकांचं कामकाज पूर्णपणे प्रशासन व पर्यायाने आयुक्तांच्या हातात होतं. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये यासंदर्भातल्या खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीआधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका अखेर जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता मिळते याकड सर्वांच लक्ष आहे. आपण दिवसभर पहा अपडेट फक्त लेट्सअप मराठीवर.

छत्रपती संभाजीनगर पालिकेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरमधे 59.82 टक्के इतकं मतदान झालं. संभाजीनगरमधून 115 सदस्याच्या 29 प्रभागांमधून 859 उमेदवार रिंगणात होते. सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने निवडणूक रंगतदार झाली होती. आज शहरात चार ठिकाणी 10 वाजता एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यावरून झालेल्या अनेकांवर लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या शरीरावर व्रण उमटले आहेत. विकास जैन अशा मारहाण झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो. ज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या किंकाळ्या, आरोळ्या आणि आक्रोश ऐकायला येत आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे व त्याचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हरातील पॉलिटेक्निक कॉलेज येथे सकाळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी माजी महापौर विकास जैन यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून ते जखमी झाल्याचे दिसून येत आहे.

एकूण 115 जागांपैकी आतापर्यंत 33 जागांचे कल जाहीर झाले आहेत. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपने 12 जागांवर आघाडी मिळवली असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती भक्कम होताना दिसत आहे.

शिवसेनेने आतापर्यंत 6 जागांवर आघाडी घेतली आहे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 5 जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमनेही 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. शहरातील आपली ताकद कायम ठेवली आहे. काँग्रेसने 3 जागांवर समाधानकारक कामगिरी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 1 जागांवर आघाडी मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर पोस्टल निकाल -एकूण जागा – 115

भाजप 4

शिवसेना 3

शिवसेना UBT 3

एमआयएम 5

काँग्रेस1

राष्ट्रवादी 00

राष्ट्रवादी SP 00

किती टक्के झालं मतदान?

महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल सुमारे 59 टक्के मतदान झाले. बोगस मतदान, वादविवाद, मारामारी वगळता कुठेही मोठा अनुचित प्रकार झाला नाही. महापालिकेच्या 115 जागांसाठी 859 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1267 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार झाले. अर्ध्या तासात ईव्हीएम बदलण्यात आले. 2015 च्या निवडणुकीत 63 टक्के मतदान झाले होते. प्रभाग पद्धतीमुळे 4 टक्के मतदान घटल्याचे दिसून आले.

कुणाची प्रतिष्ठापणाला

भाजपकडून मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेचा किल्ला लढवला. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना उबाठाकडून खिंड लढवली. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम सुद्धा रणांगणात होते. त्यामुळे इथली निवडणूक चुरशीची ठरली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीमुळे कुणाचा गेम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

follow us