Download App

Maratha reservation agitation : जालन्यात पोलिसांकडून आज पुन्हा गोळीबार; आंदोलकांनीही जाळल्या गाड्या

  • Written By: Last Updated:

Maratha reservation agitation : जालन्याच्या आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण (Maratha reservation agitation)आंदोलनातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. तसेच जालन्यात आज पुन्हा रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

Jalna Maratha Andolan वर बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नकार; शरद पवार जालन्यात…

पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला…

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते घटनास्थळी भेटी देत आहेत. तसेच ठीकठिकाणी या घटनेनिषेधार्थ आंदोलनं (Maratha reservation agitation) केली जात आहेत. य जालन्यात आज पुन्हा रास्ता रोको करण्यात आला. शरातील अंबड चौफुलीवर आंदोलकांनी खासगी गाड्या जाळण्यास सुरूवात केली होती. तसेच आंदोलकांनी दगडफेक केली. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे आजही जालन्यात हिंसक वळण मिळाले होते. मात्र त्यानंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Maratha Aandolan : गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज, सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी

नेमकं काय घडलं होतं ?

मराठा आरक्षण (Maratha reservation agitation) व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

या आंदोलनाची (Maratha reservation agitation) दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.

Tags

follow us