Maratha Aandolan : गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज, सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी
Nana Patole : शुक्रवारी जालना शहरात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर (Maratha Aandolan) पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी अनेक शहरांमध्ये बंदची हाक दिली आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी सात बसेस जाळल्यात. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकारवर टीका केली.
https://www.youtube.com/watch?v=wMp83yjJFdk
आज माध्यमांशी बोलतांना पटोलेंनी सरकावर निशाणा साधला. ते म्हणाले की, गृहमंत्री यांच्या आदेशाने झालेल्या लाठीचार्जचा निषेध आम्ही निषेध करतो. हे महायुतीचं सरकार सुलतानी सरकार आहे, याचा प्रत्यय वारंवार येतो. स्वतःसाठी जगणारं सरकार आहे, हे सरकार केवळ लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांना अधिकार नसतांनाही चुकीचा कायदा आणून आम्ही मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. 24 तासात आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. आणि आता लाठीचार्ज केला. हे म्हणजे, उलट्या चोराच्या बोंबा आहेत, अशा शब्दात पटोलेंनी फडणवीसांवर टीका केली.
भाजपने आरक्षणाचं गाजर दाखवलं तेव्हा सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं. आणि आता आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या उपोषण मंडपावर लाठीचार्ज केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे. काल इंडियाची बैठक होती. त्यात राहुल गांधी यांचं भाषण चर्चेतून घालवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे पाप केले, असा आरोप पटोलेंनी केला.
Shilpa Shetty Look: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा लेहंग्यातील अनोखा अंदाज पाहिलात का?
लहान मुलांवर लाठीचार्ज झाला. आमिष देऊन मराठा समाजावर लाठीचार्ज केला. यात निर्दोष लोकांवर लाठीचार्ज झाला, बसेस जाळल्या जात आहेत, सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीचं पाप जनता भोगत आहे. आता स्वतः सरकारने राजीनामा दिला पाहिजे, जनता माफ करणार नाही, असंही पटोले म्हणाले.
महाराष्ट्राची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. यात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल. त्यासाठी राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली, असं पटोले म्हणाले.
मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं. त्यावरही पटोलेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, नियमित अधिवेशन आताच संपलं. पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही. आणि आता अधिवेशन बोलवत आहेत. हे जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न पडले आहे, दुष्काळ परिस्थिती असताना केंद्रातील सरकार यावर बोलायला तयार नाही, अशा शब्दात पटोलेंनी मोदी सरकारवर टीका केली.
भाजप वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत मांडणार आहे. याविषयी पटोलेंना विचारले असता ते म्हणाले, मला असं वाटत की, समर्थन करण्यास हरकत नाही. पण निष्पक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, जाती-पातीवर मतदान व्हावं, बॅलेटवर निवडणुका व्हाव्या. मात्र, हे सरकार लोकशाहीचा खून करत आहे, गळा कापण्याचे पाप हे करताहेत, असं पटोले म्हणाले.