Download App

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश, मनोज जरांगेंचे उपोषण मागे

Jalna News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर दोघांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.

या भेटीत दोघा जणांनी ग्रामस्थांसमोरच चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयो मंत्री सांदिपान भुमरे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आदी उपस्थित होते. शिंदे येथे आल्यानंतर दोघांत चर्चा झाली. त्यानंतर काही वेळात शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांनी सतरा दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.

मी शिंदेंना सराटीत आणलचं; उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा जोश कायम 

यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले,  मी भारावून न जाता समाजाच्या प्रश्नांचं भान ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे. मी शब्द दिलाय तुमच्या पदरात आरक्षण (Maratha Reservation) टाकणारच. याआधी मी समाजाला विश्वासात घेतलं. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का?, तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का?, हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला.

तुम्ही काळजी करू नका, आरक्षण मिळवणारच

सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचं खाऊन समाजाचं काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी शिंदेंना येथे आणूनच दाखवलं. तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. त्यांनाही माहिती आहे. कारण, एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतात अशी माझी खात्री आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

‘आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही’; CM शिंदे येण्याआधीच जरांगेंचा रोखठोक इशारा 

 

Tags

follow us