‘आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही’; CM शिंदे येण्याआधीच जरांगेंचा रोखठोक इशारा

‘आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही’; CM शिंदे येण्याआधीच जरांगेंचा रोखठोक इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे आज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभुमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

‘इतकी फेकाफेकी मी बघितली नाही’; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जरांगेंची खास शैलीत टिप्पणी 

जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, समाजासमोर जे विषय ठरले होते. त्या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला प्रबोधन केलं तर समाजात चांगला संदेश जाईल. समाजाचा आत्मविश्वास वाढेल. फक्त यासाठी मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीची मागणी केली. आता सीएम शिंदे भेटीसाठी येत असल्याचे कळत आहे. आरक्षण मिळेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. एवढंच उत्तर माझ्याकड आहे. मी मुख्यमंत्र्यांबरोबर बंद खोलीत चर्चा करणार नाही. तर माध्यमांसमोरच चर्चा करील. सगळं काही समाजासमोर घडेल. समाज प्रत्यक्ष ही चर्चा पाहिले, असे जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय – जरांगे पाटील

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही उपोषण सोडायला तयार, पण ते सोडवायला कुणी येतच नाहीत, आरक्षणाचा जसा खेळखंडोबा मांडलाय त्यातलाच हा प्रकार. एखादा मित्र दुसऱ्या मित्राला जसं म्हणतो की ये… नुसतं ये म्हणतो. तसं हे म्हणतात की आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ द्या. पण ती वेळ नेमकी कशासाठी पाहिजे हे मात्र सांगत, नसल्याचंही मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी स्पष्ट केले होते.

‘रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी…’; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले 

व्हायरल व्हिडीओने सरकार बॅकफूटवर

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषदेआधीचा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार या तिघांच्या संभाषणाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. मनोज जरांगे यांनीही यावर टीका केली होती. सोशल मीडियातूनही सरकारवर प्रचंड टीका केली गेली. त्यानंतर स्वतः सीएम शिंदे यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले होते. तरीदेखील विरोधकांची टीकेची धार कमी झालेली नाही. या प्रकारामुळे सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube