‘इतकी फेकाफेकी मी बघितली नाही’; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जरांगेंची खास शैलीत टिप्पणी

‘इतकी फेकाफेकी मी बघितली नाही’; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जरांगेंची खास शैलीत टिप्पणी

इतकी फेकाफेकी मी बघितली नाही, अशी खास टिप्पणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन मनोज जरांगे यांनी खास टीप्पणी केलीयं.

केरळमध्ये हायअलर्ट, शाळा बंद; देशाची काळजी वाढवणारा ‘निपाह’ किती धोकादायक?

मनोज जरांगे म्हणाले, अर्जुन खोतकर कारखान्याकडे, रिसिव्ह करायला जातोय असं म्हणून निघाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांनाच आणायला गेले असतील, असं वाटतंय. पण तरीही असं अचानक दौरा रद्द होत असेल तर माझं डोकं बंद पडायचं काम झालं असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

सत्तेतील सहभागासाठी रोहित पवारांचंच पहिलं समर्थन; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला भेटालया येणार आहेत, याबद्दलच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर मला समजलं की ते येणार आहेत. त्यामुळे मला असं कोणीही अधिकृतपणे सांगितलं नव्हतं, पण मी अशा बातम्या ऐकत असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच मला जास्त राजकारण कळत नाही, इतकी फेकाफेकी मी बघितली नाही. राजकारणात गोम असते… हे लोक शेंगा हाणत आहेत.. तरीही मुख्यमंत्री येतील असा मला विश्वास असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यानूसार निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचा अहवाल काहीही येवो, आरक्षण द्यावेच लागेल. राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतील, लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निलंबित करा, तसेच उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे आले पाहिजेत, अशा प्रमुख अटी जरांगे पाटलांनी राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत.

katrina kaif: कैटरीना कैफ ठरली इतिहाद एअरवेजची ब्रँड अँम्बेसेडर !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या घडामोडींतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्याबरोबर चर्चा केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा सुरु असून कालही राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी गेलं मात्र, ही भेट निष्फळ ठरली, आजही राज्य सरकारचं शिष्टमंडळ जाणार असून शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची नेमकी काय चर्चा होते? त्यावर पुढील निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube