‘रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी…’; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

  • Written By: Published:
‘रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी…’; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

Chandrasekhar Bawankule on eknath khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून खडसेंच्या सून रक्षा खडसे या सध्या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सून आणि सासरे यांच्यात लढत होऊ शकते. दरम्यान, यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी वक्तव्य केलं.

आज माध्यमांशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना खडसेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, रावेरमध्ये कोणीही उभे राहिले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे (रावेरच्या विद्यमान खासदार) विजयी होतील. रक्षा खडसे या निवडणुकीत सुमारे दोन लाख मतांनी विजयी होतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे रावेरमधून लढले तरी त्या निवडणुकीत रक्षा खडसेच जिंकतील. कारण त्यांनी ज्या पद्धतीने तिथे काम केले आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षात आमच्या सर्व खासदारांनी खूप चांगले काम केले आहे. रक्षा खडसे यांनी देखील त्यांच्या मतदार संघात खूप चांगली कामे केली आहेत. त्या मतदार संगात पायी फिरल्या आहेत. त्यामुळं रावेरमध्ये कोणीही लढले तरी रक्षा खडसे विजयी होतील, इतकी त्यांची ताकद आहे.

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर फायनलमध्ये भारताशी कोण भिडणार? 

जयंत पाटील काय म्हणाले ?

आता आगामी लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यातून कोण? हा प्रश्न आमच्या मनात आहे. नाथाभाऊ हे शिवधनुष्य तुम्हीच उचललं पाहिजे, असं आम्हा सर्वांना वाटतं. तुम्ही 25 ते 30 वर्षे प्रत्येकी दोन-दोन खासदार निवडून दिलेत. एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत. त्यामुळं तुम्ही लोकसभा लढण्याचं शिवधनुष्य उचललं पाहिजे.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर खडसे यांनी पक्षाने जबाबदारी आदेश दिला तर लोकसभा लढण्याचे संकेत दिले होते. त्यावर खडसे म्हणाल्या की, रावेर लोकसभेचा इतिहास पाहिला तर सातत्याने या ठिकाणी भाजपचाच विजय होत आला. भविष्यातही हीच जागा भाजपच जिंकणार असा असा दावा केला. तर बावनकुळेंनी रक्षा खडसेच विजयी होतील, असं सांगितलं.

आगामी काळात रावेरमध्ये दोघांनी लोकसभा निवडणूक लढवली तर राजकीय रणांगणात सासरे आणि सुन आमने-सामने येऊ शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube