Download App

सरकारकडून मनोज जरांगेंची मनधरणी, अजून वेळ देण्याची मागणी

Maratha Reseravation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reseravation) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यासंदर्भात आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन आणि संदिपान भुमरे यांनी राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली.

गिरीष महाजन म्हणाले की मराठा समाजाचे कुणबी दाखले शोधण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत. शिंदे समितीने हजारो पुरावे शोधले आहेत. राज्य सरकारने अधिवेशनात देखील मराठा आरक्षणावर चर्चा घेतली. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल आहे. दुसरा पर्याय मागासवर्ग आयोग नेमण्याचा ठेवला आहे. गेल्या वेळी कोर्टात ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार आरक्षण देण्यावर ठाम आहे. फक्त 24 डिसेंबरचा आग्रह धरु नका.

‘उद्धव ठाकरेंचा मोर्चा फुसका बार, स्वत:ची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न…’; बावनकुळेंची टीका

मागील आंदोलनावेळी काही अप्रवृत्तीनी फायदा घेतला. बीडमध्ये आमदारांचे घरं जाळण्यात आली. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आंदोलन भरकटू नये ही आमची इच्छा आहे. त्यामुळे 24 डिसेंबरचा आग्रह धरु नका, असे गिरीष महाजन म्हणाले.

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

मराठा समाजाला सरकट कुणबी दाखले देण्यात यावेत अशी जरांगे यांची मागणी आहे. गेल्या काही दिवसांत जरांगेंनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. सरकट कुणबी दाखले देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. यावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात वाद पेटला आहे.

छगन भुजबळ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे नेते त्यांच्याशी बोलत आहेत. आम्ही मनोज जरांगे यांना सांगितले आहे की दोन्ही बाजूने थांबले पाहिजे. मी स्वत: छगन भुजबळांची भेट घेणार आहे. समाजात वाद निर्माण होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे, असे गिरीष महाजन यांनी सांगितले.

Tags

follow us