Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी उपोषणे सुरू केली जाणार आहेत. राजकीय नेत्यांना गावबंदीही केली जाणार आहे. दरम्यान, याआधी काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द दिला. मात्र तरीही जरांगे पाटील यांचा निर्धार कायम आहे.
उद्धव ठाकरेंना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं; मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा डिवचलं
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर मोठा भडका उडाला होता. त्यानंतर सरकारने चर्चा करून आरक्षणाबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. या चाळीस दिवसांच्या काळात सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, या मुदतीत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुढे काय करणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते पुढील आंदोलनाबाबत माहिती देतील असे सांगण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणारच – शिंदे
शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी मराठा आरक्षण देणारच, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी काल दसरा मेळाव्यात मराठा समाजाला शब्द दिला. मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आमरण उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपली. त्यानंतर पुन्हा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी दसरा मेळाव्यात बोलताना शपथ घेऊनच आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या आवाहनानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी शपथ घेतली ही समाजासाठी चांगली गोष्ट आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे.
…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा