Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange-patil) पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळतो. मराठा समाज आक्रमक झालेला पाहून सरकार नमलं. सरकारने मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला. मात्र, मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, त्यांचं गाव आंदोलनस्थळी आले. यावेळी त्यांनी जीव गेला तरी चालेल, पण आरक्षण मिळवून देईल, आता आरक्षणसाठी एकही मूडदा पडू देणार नाही, असं सांगितलं.
मनोज जरांगे यांचे कुटुंबीय आणि अख्खा गाव आंदोलनस्थळी आला होता. जरांगेची आई उपोषणस्थळी आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल होते. आई व्यासपीठावर दाखल होताच जरांगे यांनी त्यांचे आशीर्वाद घेत गळाभेट घेतली. यावेळी त्यांच्या आईला देखील हुंदके आवरता आले नाही. उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्या आईला धीर देत त्यांना आधार दिला.
यावेळी जरांगे पाटील बोलतांना म्हणाले की, माझं जन्मगाव बीड जिल्ह्यात, पण आज अख्खा गाव आंदोलनास्थळी आला. एकही माणूस घरी राहिला नाही. गाव काय असतं, अन् गावाचं लेकरावर काय प्रेम असतं, हे या गावानं दाखवून दिलं. गाव आल्यानं मला हत्तीचं बळ आलं. माझं गाव कुलूपबंद करून इथं आलं, मी हे उपकार कधीच विसरणार नाही
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे सिनेमा का चालत नाहीत? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण, म्हणाली…
ते म्हणाले, मी कधी भावकी आणि गावकी बघितली नाही. हा समाजच माझा मायबाप आहे. मी लढलो, माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून. मी कधीही गावासाठी, कुटुंबाासाठी लढलो नाही. महाराष्ट्रातील मराठा माता-माऊल्यांना सांगायचे आहे. आरक्षणासाठी तुमचे मुडदे पडले, पण आता मी ते होऊ देणार नाही. जीव गेला तरी चालेल. पण मराठ्यांची मान खाली जाऊ देणार नाही. रक्ताच्या शेवटच्या थेबापर्यंत माझा जीव पणाला लावले. पण, तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं ते म्हणाले.
माझ्या काळात पाच ते सहा सरकार होती. मात्र, मी एकासोबतही संबंध प्रस्थापित केले नाहीत. मी माझ्यासमाजाशी प्रामाणिक राहिलो. आता आपल्याला हे आंदोलन यशस्वी करायंचं. पण आदोलन शांततेनं करायचं आहे. मराठा समाजाला गालबोट लागेल, असं कोणीही कृत्य करू नका, असं ते म्हणाले.