Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे सिनेमा का चालत नाहीत? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण, म्हणाली…

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचे सिनेमा का चालत नाहीत? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण, म्हणाली…

Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. (Social media) प्राजक्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखा स्थान निर्माण केले आहे. (Serial) ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या सुप्रसिद्ध सिरियलमधून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून देखील अद्याप प्राजक्ताचा एकही सिनेमा सुपरहिट ठरला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suta- Mindful Lifestyle Brand (@suta_bombay)


नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीच्या दरम्यान प्राजक्ताने यापाठीमागचे कारण सांगितले आहे. प्राजक्ता सांगितले आहे की, “माझ्याकडे काम नाही, अशी वेळ नशिबानं अजूनपर्यंत आली नाही. मी आजपर्यंत जितकं काम केलं आहे, कदाचित त्याहून जास्त नाकारलं आहे. मला कधीही कामाची कमतरता जाणवली नाही. मात्र सिनेमाबद्दल मला अजून हवं तसं काम मिळाले नाही. म्हणूनच कदाचित माझा एकही सिनेमा सुपरहिट ठरला नाही. मी सिरीयल, नृत्ययांमध्ये अनेकदा बराच वेळ घालवला का? मी कोणत्याही ग्रुपचा भाग नाही. मला खोटं आजिबात वागता येत नाही.

माझ्या चेहऱ्यावर सगळं काही दिसतं किंवा मी ॲव्हरेज अभिनेत्री असेन, अशी बरीच कारणं राहू शकतात. पुढे प्राजक्ता म्हणाली आहे की, “काम मिळतं; पण जसं काम हवं तसं मिळवण्यासाठी सतत धडपड करत असते. एकदा एक काम मिळालं की, त्याचं आकर्षण कमी होतं आणि नवीन कामाची ओढ लागत असते. यामुळे महत्त्वाकांक्षा आणि समाधान यांचा समतोल साधता येणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असत.

Kangana Ranaut: ‘जवान’चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘शाहरुख हा…’

प्राजक्ताच्या कामाविषयी सांगायचं झालं तर प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. लवकरच तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे, असे बरेच हटके कलाकार बघायला मिळणार आहे. प्राजक्ताचा हा सिनेमा २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube