Download App

Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी आता 20 जानेवारीपासून मुंबईत (Manoj Jarange) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आमची सगळी तयारी झाली आहे. आम्ही सज्ज आहोत. आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही, असे वक्तव्य करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाची माहिती दिली. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही जोरदार टीका केली.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामं आटोपून ठेऊन मुंबईत धडकायचं आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा बांधव करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही. तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबईमधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Manoj Jarange : तर मराठ्यांवर अन्यायच! हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला

आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे मात्र क्यूरेटिव्ह पीटिशनवर आम्हाला शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला की मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार आहोत. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली, असे जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मला बाबा धाकच बसला, त्या माणसाचा. आम्ही सुसंस्कृतपणा तुमच्याकडून का शिकावा भुजबळ. पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार, असा सवाल जरांगे पाटील यांनी भुजबळांना केला. मराठा आणि ओबीसीत भांडणं लावण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे.  पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचं प्रेम तुटू शकत नाही.

Tags

follow us