Chhagan Bhujbal : पडळकरांवर चप्पलफेक; भुजबळ म्हणाले, दादागिरी थांबली नाही तर आम्ही…

Chhagan Bhujbal : पडळकरांवर चप्पलफेक; भुजबळ म्हणाले, दादागिरी थांबली नाही तर आम्ही…

Chhagan Bhujbal : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना काल इंदापुरात घडली. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर ही घटना घडली. या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

या घटनेवर संताप व्यक्त करत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! आज विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली. या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो. मी आजही इंदापूर येथ जाहीर सभेत सांगितलं आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ! असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’; भुजबळांचा थेट इशारा

चप्पलफेक म्हणजे नौटंकीच – पडळकर

दरम्यान,  इंदापुरातील या घटनेवर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. इंदापुरातील चप्पलफेकीचा प्रकार म्हणजे एक नौटंकी आहे. कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करू नये. उद्या अधिवेशनावर मोर्चा घेऊन जाणारच आहोत अशी प्रतिक्रिया आमदार पडळकर यांनी दिली. कालच्या या घटनेचा धनग र समाजाच्यावतीनेही ठिकठिकाणी निषेध केला जात आहे.

इंदापुरात नेमकं काय घडलं होतं ?

इंदापुरात काल ओबीसी एल्गार सभा पार पडल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर इंदापूरमध्येच असलेल्या मराठा आंदोलनस्थळाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आपण या ठिकाणी का आलात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यानंतर पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी चप्पलफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओबीसी एल्गार सभेत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर काही वेळातच पडळकरांना मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं.

Gopichand Padalkar : ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिमागं उभं राहा; भुजबळांसाठी पडळकर मैदानात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube