Manoj Jarange : …तर मराठ्यांवर अन्यायच! हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला
Manoj Jarange : मराठा-कुणबी एकच आहेत. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे फक्त निम्म्याच मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod)यांनी सांगितलेला फॉर्म्यूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाकारला आहे.
काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?
आज हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावर तयार केलेल्या फॉर्म्युला मनोज जरांगे यांना सांगितला. मात्र आपण जर राठोड यांचा फॉर्म्युला स्वीकारला तर 50 टक्के मराठा समाजावर अन्याय होणार असल्याचे यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला मान्य नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
Congress च्या स्थापना दिनी महारॅली; देशभरातील कॉंग्रेस नेते भाजपविरोधात एकवटणार
हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी आरक्षणाचे तीन गट करुन प्रत्येकी नऊ टक्के आरक्षण देता येत असल्याचे सांगितले. त्यावर जरांगे पाटील यांनी आम्हाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण हवं आहे असं सांगितलं. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, सरसकट या शब्दाचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी केला आहे. पाच कोटी मराठे हे ओबीसीमध्ये येणार आहेत, आणि मग आपल्याला काहीच राहणार नाही असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. यापूर्वीच विदर्भातील मराठे हे आरक्षणात गेले आहेत. खान्देशचे मराठे आरक्षणात आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 60 टक्के मराठे आरत्रक्षणात गेलेत. कोकणचा पठार भाग देखील सर्व आरक्षणात गेला आहे. त्यामुळं खाली मराठे राहिलेत कोण? फक्त मराठवाडा आणि उर्वरित काही जिल्हे. सामान्य ओबीसी बांधवांना तेच खरं वाटतं की पाच कोटी मराठे आरक्षणात येणार आहेत. त्यामुळं ओबीसी नेत्यांनी खरं बोलावं, असंही यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, तरीदेखील काही ओबीसी नेते म्हणतात की त्यांना ओबीसीत घेऊ नका. गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आता ठरवलं आहे की, जर मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या असतील तर आता ओबीसी नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे, मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे.
जर मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे विनाकारण भांडण कशाला विकत घ्यायचं अशा गावखेड्यात चर्चा सुरु असल्याचेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.