Download App

‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य

Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी या मुदतीचा उल्लेख करत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. जरांगे यांनी थेट फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) गळाभेट घेण्याचे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीस यांची गळाभेट घेण्याचे सूतोवाच केले.

यावेळी पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केला यानंतर ते भेटायला येतील अशी अपेक्षा कशी करू शकता असा प्रश्न विचारला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, मी कुठं फडणवीस यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा आहे का असं तुम्हीच विचारता. माझी इच्छा आहे त्यांनी मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन यावं. मग भेटण्याची इच्छाच कशाला मी थेट गळ्यातच पडतो त्यांच्या असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’ छगन भुजबळांचा गंभीर आरोप

ओबीसी नेत्यांकडूनच भांडणं लावण्याचं काम 

आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल अशीच गावागावांतील ओबीसींची भावन आहे. मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. तसेच ज्यांनी आमच्या समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकलं पाहिजे. आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही आधीपासूनच कुणबी आहोत. आम्ही असं केलेलं नाही की आमच्याकडे पुरावा नाही आणि आम्ही ओबीसीत गेलोय. तसं काहीच केलेलं नाही. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच आम्हाला प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. सामान्य ओबीसींना माहिती आहे की मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत. हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

एखाद्याकडं जमीन असेल आणि त्याचे पुरावे जर त्याच्याकडे असतील तर त्याला ती जमीन मिळाली पाहिजे. गोरगरीबांचं वाटोळं झालं पाहिजे ही भावना ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. आतापर्यंत 40 वर्षे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. आता ओबीसी लोकांना हे कळलं आहे. ओबीसी नेत्यांचं ते आता ऐकणा नाहीत अशी आम्हाला खात्री आहे. आमचंच आरक्षण आम्हाला दिलं जात आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारचं म्हणणं योग्यच आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation: सरकार म्हणून भूमिका की वैयक्तिक? भुजबळ, देसाईंच्या विधानावरून वडेट्टीवारांचा सवाल

follow us