24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करू; जरांगे पाटलांच्या निशाण्यावर कोण ?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. जे आमचं आहे तेच सरकार आम्हाला देत आहे. आम्ही कुणाचंही हिरावून घेत नाही. मराठा समाजासाठी सरकारचं काम जोरात सुरू आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडू लागली आहेत. मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात […]

Manoj Jarange : तो टर्निंग पॉईंट नाही तर आंदोलवरील डाग; आंतरवलीतील लाठीचार्जवर जरांगे संतापले

Manoj Jarange :

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. जे आमचं आहे तेच सरकार आम्हाला देत आहे. आम्ही कुणाचंही हिरावून घेत नाही. मराठा समाजासाठी सरकारचं काम जोरात सुरू आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडू लागली आहेत. मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यावरून लक्षात येतं की सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत नाही. जर असं काही केलं तर आम्ही सावध आहोतच. 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आरक्षण विरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा

ओबीसी नेत्यांकडूनच भांडणं लावण्याचं काम 

आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल अशीच गावागावांतील ओबीसींची भावन आहे. मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. तसेच ज्यांनी आमच्या समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकलं पाहिजे. आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही आधीपासूनच कुणबी आहोत. आम्ही असं केलेलं नाही की आमच्याकडे पुरावा नाही आणि आम्ही ओबीसीत गेलोय. तसं काहीच केलेलं नाही. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच आम्हाला प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. सामान्य ओबीसींना माहिती आहे की मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत. हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारचं म्हणणं बरोबरच 

एखाद्याकडं जमीन असेल आणि त्याचे पुरावे जर त्याच्याकडे असतील तर त्याला ती जमीन मिळाली पाहिजे. गोरगरीबांचं वाटोळं झालं पाहिजे ही भावना ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. आतापर्यंत 40 वर्षे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. आता ओबीसी लोकांना हे कळलं आहे. ओबीसी नेत्यांचं ते आता ऐकणा नाहीत अशी आम्हाला खात्री आहे. आमचंच आरक्षण आम्हाला दिलं जात आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारचं म्हणणं योग्यच आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’ बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं

Exit mobile version