जालनाः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे गेल्या अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जरांगे हे जालन्यातील अंतरवाली सरोटी येथे उपोषण करत आहेत. जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारकडून काही हालचाली झाल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन निर्णय काढला आहे. त्यातील वंशावळीला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम आहेत.
PSIव्हायचयं! MPSC तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी निघाली भरती, ‘या’ तारखेपूर्वी करता येईल अर्ज….
तर मराठा समाजातील पोटजातीबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे पाटील यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. तसेच काही रोखठोक सवालही उपस्थित केला आहे. जरांगे पाटील म्हणाले, कुणी वाड्यात राहा, बंगल्यात राहा, जंगलात राय पण कुणबीला प्रमाणपत्र मिळण्यास विरोध करू नको. मराठ्यांमध्ये ९६, ९८, ९९ पोटजाती आहेत. 96 कुळ्यांना कुणबी प्रमाणपत्र लागत नसेल बिनधास्त मोकळे राहा. मोठे पाटील राहा, लहान पाटील राहा आहे.
पण इतर गोर-गरीब मराठ्यांच्या तरुणांच्या कुणबी प्रमाणपत्रास विरोध करू नका, असा सल्लाही जरांगे यांनी केला आहे. जेव्हा तुम्हाला चाळीस वर्षांनी कुणबी प्रमाणपत्र लागेल तेव्हा, घ्या असे जरांगे म्हणाले.
ओबीसी समाजाकडून मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यास विरोध होत आहे. त्यावर जरांगे म्हणाले, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणातील काही भागातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे कोणते मराठे हे ओबीसीमध्ये यायचे राहिले आहेत. केवळ मराठवाड्यातील मराठे व काही इतर भागातील एेवढे मराठे ओबीसीत यायचे राहिले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाने विरोध करू नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाचे पोटजात ही कुणबी आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राला विरोध होऊ शकत नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.