Download App

मोठी बातमी! मराठा आंदोलनाची घोषणा मनोज जरांगेंनी पुढं ढकलली, हे आहे कारण

Image Credit: letsupp

Maratha Reseravation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षण (Maratha Reseravation) दिले नाही तर पुढील दिशा आंतरवाली सराटी येथे आज ठरणार होती. मात्र याबाबतचा निर्णय आता मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबरला सभा होणार आहे. यासभेतून आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांची भूमिका कळल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर सविस्तर भूमिका मांडणार आहेत. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम आहेत, असा निरोप देण्यात आला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजचं सांगितल्यास सरकारच्या लक्ष्यात येईल. आता मराठा समाजाला परत फिरु द्यायचं नाही. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढाईची आहे. उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करु द्यावी, अन्यथा तुम्हीच आधीच भूमिका जाहीर करुन टाकली म्हणतील. त्यामुळे बीड येथील 23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

CM यादव यांना उज्जैनमधील मुक्काम महागात पडणार? खुर्चीवर आठवड्याभरातच टांगती तलवार

बीडवर सर्वांचे लक्ष्य
23 डिसेंबरला बीडमध्ये दुपारी एक वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक, बीड बायपास मांजरसुंभा रोड येथे सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी तब्बल 50 एकर जागा तयार केली आहे. या सभेसाठी 40 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सभेच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाच्या बैठका देखील झाल्या आहेत. मात्र आता आंदोलनाची दिशा याच सभेत ठरवली जाणार आहे. त्यामुळे या सभेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज