शरद पवारांची भीती वाटत असल्यानेच त्यांच्यावर टीका; फडणवीसांना जयंत पाटलांनी सुनावले !
Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज मराठा आरक्षणाची (Maratha reservation) मागणी करत आहे. मात्र, अद्याप यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळं अनेकदा मनोज जरांगेसह विरोधकांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली. मात्र आज फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून शरद पवारांवर टीका केली. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, असं वक्तव्य त्यांनी केलं. याला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं.
ISRO Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना इस्रोत नोकरीची संधी, महिन्याला 69 हजार रुपये पगार
आज जयंत पाटील पनवेलमध्ये एका कार्यकमात बोलतांना म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा एकमेक कार्यक्रम शरद पवारांवर टीका करणं हा आहे. आज उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत आपली पक्षाची दिशा, सुत्र यावर बोलणं गरजेचं होतं. मात्र, त्यांनी शरद पवारांवर टीका करण्यात निम्मा वेळ खर्च केला. फडणवीसांनी पवारांवर टीका करण्यातच धन्यता मानली. कारणं त्यांना पवारांची भीती वाटते. त्यामुळं त्यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला. शरद पवारच फिरणार अश्वमेध अडवू शकतात, हे त्यांना ठाऊक आहेत. आणि याच कारणामुळं कुठला तरी मुद्दा उपस्थित करून पवारांवर कायम टीका केली जाते. त्यांनी कसा कुणाच्या आरक्षणात ख्वाडा घातला, हे चुकीच्या पद्धतीने सांगिल्या जातं, असं पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, तावडेंच्या विधानाने शिंदे-अजितदादांना धडकी
पाटील म्हणाले, भाजपला शरद पवारांची भीती वाटत असल्यानं ते पवारांविषयी चुकीच्या बातम्या पेरतात. त्यांच्यावर चुकीची टीका करतात. पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला अशी टीका फडणवीस करतात. मात्र, पवारांनी ओबीसी आणि मराठा समाजासाठी काय केलं, हे दोन्ही समाजला ठाऊक आहे, असं पाटील म्हणाले.
शरद पवार हे कायम सत्तेत नव्हते. फडणवीस आता ज्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले, ते पंधरा वर्षापासून सत्तेत होते. शेजारी बसलेल्या पाव्हणांना जरा विचारा- आरक्षण का दिलं नाही? 1993 सालानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री पद भूषवलं नाही. मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं नाही… आता तुम्ही पवारांवर टीका करता, तेव्हा तुम्ही तुमच्या सोबत सध्या सत्तेत असलेल्या नेत्यांच्या विरोधातही बोलत असता, असं फाटील म्हणाले. शेजारी बसलेल्यांना शरद पवारांच्या विरोधात माडंलेली भूमिका कशी मान्य होते, असा सवालही त्यांनी अजित पवार गटाला केला
यावेळी बोलतांना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवरही टीका केली. आज आरक्षणाच्या मुद्दावरून दोन समाजात संघर्ष पेटला आहे. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची, मुख्यमंत्र्यांची भुमिकाच कळत नाही. मंत्रिमंडळाच आऱक्षणावर एकमत नाही. ओबीसींनी हे सरकार निधी देत नाही, ओबीसींना डावलल्या जातं, हे सरकारमधीलच एक मंत्री सांगतात. त्यामुळं मंत्रिमंडळाची आरक्षणाबाबची भूमिका काय? असा सवाल त्यांनी केला.