ISRO Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांना इस्रोत नोकरीची संधी, महिन्याला 69 हजार रुपये पगार
ISRO Bharti 2023 For Technician – B Posts: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे, ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इस्रोने तंत्रज्ञ-बी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. दरम्यान, सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. या पद भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पध्दतीने करता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार isro.gov.in. या अधिकृत वेबसाइट जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान, या भरतीचे आवश्यक तपशील जाणून घेऊ.
Pune News : भाडोत्री खोली देणाऱ्या जागामालकांच्या खिशाला झटका; मनपाचा करवाढीचा प्रस्ताव रेडी
पात्रता:
तंत्रज्ञ – बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला. तसेच उमेदवार हा NCVT मधून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC देखील उत्तीर्ण असावा.
तंत्रज्ञ – बी (इलेक्ट्रिकल): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराने माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा. तसेच उमदेवरा NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC देखील उत्तीर्ण असावा.
तंत्रज्ञ – बी (फोटोग्राफी) : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा आणि NCVT मधून फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC देखील उत्तीर्ण असावा.
तंत्रज्ञ – बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार एसएससी उत्तीर्ण असावा आणि उमेदवार NCVT मधून डेस्कटॉप प्रकाशन ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उत्तीर्ण असावा. सोबत माध्यमिक शाळा सोडल्याचा असावा.
वय श्रेणी
पात्र उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान आहे. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना वयाची 5 वर्षे सूट दिली जाईल आणि OBC उमेदवारांना वयाची 3 वर्षे सूट दिली जाईल.
निवड कशी होईल?
लेखी परीक्षा:
80 बहुपर्यायी प्रश्न.
कालावधी: 1 तास 30 मिनिटे.
कौशल्य चाचणी:
एकूण गुण: 100
उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना लेखी परीक्षेत 80 पैकी किमान 32 गुण आणि कौशल्य चाचणीत 50 पैकी 10 गुण मिळणे आवश्यक आहे. कौशल्य चाचणी हैदराबाद येथे बॅचमध्ये घेतली जाईल.
अर्ज फी
सर्व उमेदवारांना अर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 9 डिसेंबर 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023
पगार-
निवड झालेल्या उमेदवारा्ंना 21700 रुपये ते 69,100 रुपये मासिक पगार मिळणार आहे. शिवाय, सोबतच केंद्र सरकारच्या नियमांनुसार अनेक भत्तेही दिले जाणार आहेत.
जाहिरात-
https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/2023_December/NRSC_RMT_4_09122023.pdf