Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी सलाईन लावण्याचा आग्रह केला असता त्याला देखील त्यांनी नकार दिला आहे.
चौथ्या दिवशी जरांगेची प्रकृती खालावली…
गेल्या अनेक दिवस त्यांनी उपोषण करून देखील सरकारने आरक्षणाच्या मागणीवर कोणताही तोडगा काढला नाही. त्यावेळी त्यांन सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. जर 40 दिवसांनंतर देखील आरक्षण मिळाले नाही. तर आपण पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला होता. त्यानुसार 40 दिवसांनंतरही त्यांना उपोषण न मिळाल्यान जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या या उपोषणाच चौथा दिवस आहे.
दरम्यान या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती काहीशी खालावली आहे. कारण त्यांच्या पोटात अन्नपाण्याचा एक कण देखील नाही. त्यांनी सलाईन लावण्यासही नकार दिला आहे. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम दिसायला लागले आहेत. त्यामुळे ते माध्यमांशी बोलत होते तेव्हा ते सलग बोलू शकत नव्हते. त्यांना धाप लागत होती. त्यांना शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने थकवा आला आहे. तसेच त्यांच्या डोळ्यावर देखील ग्लानी आली आहे.
Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला
दरम्यान माध्यामांशी बोलताना त्यांनी सांगितले की, यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक आयोजित केली आहे. यामध्ये ते मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे जरांगे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर उद्या आणखी मराठा आंदोलक आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच ते यावेळी असं देखील म्हटले आहेत की, मराठ्यांना आरक्षण न देणं हे सरकारचं षडयंत्र आहे. त्यांना मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.