Download App

अख्खं गाव उतरलं तळ्यात! मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; कारण काय?

मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आणि सीआयडीची पथकं तयार करण्यात आली आहेत. परंतु, आज 22 दिवस उलटून गेले तरीही आरोपींचा मागमूस लागलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश वाढू लागला आहे. यातच आता गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.

ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत. या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आरोपींना अटक करण्याचं सीआयडीचं काम सुरू आहे. तेव्हा आंदोलन मागे घ्या अशी विनंती त्यांनी केली आहे.

वाल्मिक कराडला मोठा झटका! केजच्या न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची पोलीस कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला 22 दिवस उलटून गेले तरीही मारेकरी हाती आलेले नाहीत. तीन दिवसांपूर्वी बीडमध्ये सर्नपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातही आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतरही आरोपी सापडलेले नाही. या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सीआयडीकडून अथक प्रयत्न सुरू आहेत.

तर दुसरीकडे ग्रामस्थांचा संताप वाढू लागला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांना फाशी द्या अशी मागणी करत ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती देणारे पत्र ग्रामस्थांनी 31 डिसेंबरलाच पोलिसांना दिले होते. यानंतर तहसीलदार, पोलीस यंत्रणांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, ग्रामस्थ आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेत तळ्यात उतरून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

वाल्मिक कराडच्या वकीलांनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?; म्हणाले, आम्हाला राजकीय 

वाल्मिक कराडला 14  दिवसांची सीआयडी कोठडी

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव चर्चेत आलेले वाल्मिक कराड यांनी काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. यानंतर रात्री उशिरा वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना बीडच्या केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुणावणीनंतर वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.

follow us