वाल्मिक कराडच्या वकीलांनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?; म्हणाले, आम्हाला राजकीय….

वाल्मिक कराडच्या वकीलांनी न्यायालयात कोणता युक्तिवाद केला?; म्हणाले, आम्हाला राजकीय….

Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मिक कराडला मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. (Walmik Karad) रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केलं असता न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री 12.10 वाजता वाल्मिक कराड याला बीडकडे रवाना करण्यात आलं.

वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यात CID ला कसं कळालं नाही? छत्रपती संभाजीराजेंचे गंभीर आरोप

वाल्मिक कराड हा मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. दोन दिवसांपासून तो शरण येण्याच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन तो सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी सव्वाबारा वाजता सीआयडी मुख्यालयात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले.

वकीलांनी कोणता युक्तिवाद केला?

तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठे ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही. विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये आहे, तो मिळाला आहे. वाल्मिक कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचं सांगितलं पण कधी बोलावले हे स्पष्ट नाही. आम्हाला राजकीय बळी ठरवले. वाल्मिक कराडवरील 15 गुन्हे पैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनचा आहे. आम्हाला राजकीय गुंतवले. 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी स्वत: हजर झाले आहेत, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकीलांनी केला.

सरकारी वकीलांचा युक्तिवाद?

दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत म्हणून तपास करण्याची कस्टडी हवी आहे. स्पष्ट दोन कोटी रुपये मागितले आहे. मीडिया ट्रायल गृहित धरून कारवाई करता येणार नाही, असा सरकारी वकीलांनी युक्तिवाद केला.

पुणे सीआयडी कार्यालयात काय काय घडलं?

वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा 2 दिवसांपूर्वी चर्चा
सकाळी 7 वाजता: पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर आज वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते एकत्रित आले.
सकाळी 9 वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सकाळी 10 वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल
सकाळी 11 वाजता: 12 ते 1 दरम्यान वाल्मिक कराड सी आय डी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर
दुपारी 12 वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओ केला शेयर
दुपारी 12. 15 वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल
दुपारी 1 वाजता: सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मिक कराडची चौकशी सुरु

follow us
  • fb
  • instagram
  • youtube