राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर (Beed) बीड-आहिल्यानगर समीवेर मांदळी (दि.26) रोजी सायंकाळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोनांनी प्राणघातक हल्ला केला. याहल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले असून पुणे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष यांनी या हल्ल्यावरून आष्टी विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेश धस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस यांचं नांव घेत महेबूब शेख यांनी राम खाडे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजीत कटाचा भाग आहे. राम खाडे यांनी कोणाचे घोटाळे बाहेर काढले, आष्टीतील शॉपिंगमॉल बांधकामाला ‘स्टे’ आला आणि राम खाडे यांच्यार हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर आमदार सुरेश धस यांनी राम खाडे यांच्यावरील हल्याची आपणास कल्पना नाही. कुठं कोणाचं भांडण झालं, काय झालं हे अपणास माहित नाही असं म्हटलं होतं.
बीडमध्ये शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक अहिल्यानगरहून पुण्याला हलवलं
रमा खाडे यांनी कोणाच्या जमीनीचे घोटाळे बाहेर काढले होते. राम खाडे यांच्या याचिकेमुळेच सुरेश धस यांच्यासह कुटुंबावर गुन्हे दाखल झाला ना, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते.आम्ही कुठं म्हणलोय, आम्ही तर म्हणतोय चौकशी झाली पाहिजे त्याचा मास्टरमाईंड समोर आला पाहिजे असं ते म्हणाले.
त्याचबरोबर राम खाडेंना कोणी मारलय, का मारलयं याचं ब्रेनमॅपिंग झालं पाहिजे. सुरेश धसांची मागणी असेल तर त्यांचीही नार्कोटेस्ट करा, राम खाडेची पण करा. बघू कोणी हल्ला केला त्यांच्यावर जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी आंगावर घ्यायचं काही कारण नाही, असं म्हणत महेबूब शेख यांनी आमदार धसांची ब्रेनमॅपिंग, नार्कोटेस्टची मागणी केली.
