Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात गाजत आहे. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणात मंत्री वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध असल्याचे आरोप होत आहे. या सर्व आरोपांवर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावरील एख तरी आरोप खरा करून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी आज मुंडे शिर्डीत आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
वाल्मिक कराड ‘इफेक्ट’ धनंजय मुंडेंना मोठा धक्का, बीडचे नवे पालकमंत्री अजित पवार
विरोधकांकडून तसेच आमदार सुरेश धस यांच्याकडून तुमच्यावर सातत्याने आरोप होत आहेत असे विचारले असता मुंडे म्हणाले, माझ्यावर आता जे काही आरोप होत आहेत त्यातील एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. ज्यावेळेस मला बोलायचंय त्यावेळेस मी कमी पडणार नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे.
आताच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा निर्माण होणं हे माझ्यासारख्या नागरिकाला बीड जिल्ह्याच्या मातीतल्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. मला बदनाम करायचंय तर खुशाल करा आणखी कुणाला बदनाम करायचंय करा पण कृपा करून बीड जिल्ह्याला बारा ज्योतिर्लिंगातील पाचवं स्थान असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीला (परळी) बदनाम करू नका असे धनंजय मुंडे म्हणाले. वाल्मिक कराड आणि तुमच्यात आर्थिक संबंध होते असे आरोप होत आहेत असे पत्रकारांनी विचारले असता हे सगळं खोटं आहे असे उत्तर देत अधिक बोलणे धनंजय मुंडे यांनी टाळले.
बीडची सध्याची परिस्थिती पाहाता मी स्वतःचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रिपद अजित पवारांना देण्यात यावे अशी मागणी केली होती.अजितदादांनी ज्या प्रकारे पुणे जिल्ह्याचा विकास केलाय तसाच विकास अजित पवार उपमुख्यमंत्री असल्याने बीडचा देखील करतील असा विश्वास व्यक्त केला होता. बीडमधील परिस्थिती पाहता मीच पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेतली नाही, असे मुंडे म्हणाले.
बीड जिल्हा पुन्हा हादरला; मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह रस्त्यावर आढळला
बीडचा पालकमंत्री व्हावा अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यांची भावना काय असावी यापेक्षा माझ्या स्वतःची भावना नव्हती, सध्याची परिस्थिती पाहता मी स्वतः पक्षाला विनंती केली. बीड जिल्ह्याचा पालकमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांनी घ्यावी. माझी ही विनंती मान्य केली याचा मला आनंद आहे असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.