Download App

Sadabhau Khot : ‘देवाभाऊंच्या काठीला आवाज नाही…’; बीडच्या घटनेवर खोत काय म्हणाले?

देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे.

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot : सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन एकवीस दिवस झाले तरीही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार फरार असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. यावर रयत क्रांती संस्थेचे अध्यक्ष आणि मदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी भाष्य केलं.

पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, वाल्मिक कराड अन् ‘आकां’मध्ये द्वंदयुद्ध; सुरेश धसांनी नवा बॉम्ब फोडला 

सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलतांना ते म्हणाले की, बीडमध्ये एका सरपंचाची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मने सुन्न झाली आहेत. देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे. ज्या दिवशी आरोपी पकडले जातील, त्यांना या मांडवाखालून जावंचं लागेल. ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवावी, असं खोत म्हणाले.

‘….आणि माझी पोलिसाची भूमिका स्वप्नीलला मिळाली’, प्रसाद ओकेने व्यक्त केली खंत 

पुढं ते म्हणाले की, सरकारच्या तपासात जे काही समोर येईल, त्यावर कारवाई केली जाईल. तपास आता योग्य दिशेने सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात विविध व्यक्ती आणि संस्था काम करत असतात. समाजातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ते कार्यरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. आपल्याला संवेदनशील मुख्यमंत्री मिळाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही देवभाऊंच्या पाठीशी
मंत्रिपद मिळालं नसल्याने खोत नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बोलतांना ते म्हणाले की, मी नाराज नही, हे सरकार यावं याकरता आम्ही अटोकाट प्रयत्न केले. काँग्रेसची ५० वर्षांची राजवट आम्ही पाहिली आहे. त्या काळात गावगड्यांची फसवणूक केली गेली. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आणि विकासाची कल्पकता असणारं नेतृत्व देवाभाऊंच्या रुपाने महाराष्ट्राला लाभला आहे, छातीची कोट करून आम्ही उभे राहणार आहोत. आम्हाला पदाची अपेक्षा नाही, आम्ही खळं राखणारे शेतकरी आहोत, त्यामुळं आम्ही देवभाऊंच्या पाठीशी आहोत, असेही सदाभाऊ म्हणाले.

भरत गोगावले काय म्हणाले?
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, बीड जिल्ह्यातील जी हत्येची घटना घडलीये, ती अत्यंत दुर्देवी आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आली आहे. या घटनेत जे-जे आरोपी असतील त्यांना शासन व्हायला पाहिजे. आमचं महायुतीचे सरकार जर हे करू शकलं नाही, तर तो ठपका आमच्यावर पडेल, असं गोगावलेंनी म्हटलं

follow us