VIDEO’….आणि माझी पोलिसाची भूमिका स्वप्नीलला मिळाली’, प्रसाद ओकेने व्यक्त केली खंत
Jilabi Film : अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. या दोघांच्या भूमिका असलेला जिलबी (Jilabi Film) हा चित्रपपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी पोलिस इन्सपेक्टरच्या तर प्रसाद ओक बिजनेसमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, पोलिसाची भूमिका करण्याच्या माझी इच्छा होती, मात्र ही भूमिका स्वप्नीलला मिळाली, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.
Bank Holidays January 2025: जानेवारीत 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण
लेटसअप मराठीशी जिलबीच्या कलाकारांनी संवाद साधला. यावेळी प्रसाद ओके, स्वप्नील जोशी यांनी मनमोकळ्या गप्पा मारत आपल्या भूमिकांविषयी भाष्य केलं. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसादने सांगितलं की, वेगवेगळ्या भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जिलबीच्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. जिलबी या चित्रपटात मी बिजनेसमॅनच्या भूमिकेत आहे. गेली दहा-वीस वर्ष माझी आणि नितीनची मैत्री आहे. आम्ही अनेक चित्रपट केलेत. गेल्या 20 वर्षात मी 20 वेळा नितीनला सांगितलं की, मला कॉप करायचं आहे. कॉप करायची माझी खूप इच्छा आहे, काही असेल तर मला सांग… तोही काही असेल तर सांगतो, असं म्हणायचा. नंतर जिलबीची संहिता घेऊन तो माझ्याकडे आला. कॉपची भूमिका उत्तम आहे, असं मी म्हणोला. तर ही भूमिका स्वप्नील करतोय, असं नितीनने सांगतिलं.
सुरेश धसांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? महिला आयोग अॅक्शनमोडमध्ये, पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
स्वप्नीलने सांगितला किस्सा…
यावेळी स्वप्नीलने दुनियादारीच्या सेटवरील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, संजय जाधवच्या सेटवर एक नियम असतो. तो हा की, कुणी सेटवर कचरा केला, कुणाचा मोबाईल वाजला किंवा चहाचे कप इकडे-तिकडे ठेवले तर त्याला शंभर रुये दंड पडतो. दंड वसूल करायचं काम मी आणि अंकुश करतो. दुनियादारीच्या वेळी आम्ही 32 हजार रुपयांचा दंड गोळा केला होता. आणखी दंड वसूल केला असता तर दुसरी फिल्म झाली असती, असं स्वप्नील म्हणाला.
या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकसोबत अभिनेत्री शिवानी सुर्वेची देखील भूमिका आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित आणि रूपा पंडित यांनी केली आहे. तर दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं.