सुरेश धसांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? महिला आयोग अॅक्शनमोडमध्ये, पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्याबाबत आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याबाबत वक्तव्य करताना धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता प्राजक्ता माळी यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये आलाय.
पबने नववर्षाच्या स्वागतासाठी निमंत्रणासोबत पाठवलं कंडोम, पुण्यातील धक्कादायक प्रकार
धस यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधताना प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला होता. परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळाच परळी पॅटर्न आहे, या ठिकाणी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी येत असल्याचं सांगून धस यांनी महिला कलाकारांची नावे घेतली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून आणि कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल, असं म्हटलं.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच.. १/३
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) December 30, 2024
Deepika singh: दीपिकाचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो बघून वाढतील काळजाचे ठोके!
यानंतर राज्य महिला आयोगाच्या X अकाऊंटवर केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झालाय. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारण विधान तसेच त्यानंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्यांमुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं.
सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे, असं महिला आयोगाच्या वतीने स्पष्ट केलं.
चाकणकर काय म्हणाल्या?
महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल.
महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 29, 2024
दरम्यान, काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांना महिला आयोग आणि प्राजक्ता माळी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. हा विषय माझ्यासाठी संपला असून मी संतोष देशमुख हत्या प्रकरण वगळता अन्य कोणत्याही विषयावर बोलणार नाही, असं ते म्हणाले.