Download App

मध्यान्ह भोजनातून 21 विद्यार्थ्यांना विषबाधा; नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

21 Students Poisoned : नांदेड (nanded)जिल्हा परिषद शाळेच्या (Zp School)मध्यान्ह भोजनामध्ये पाल पडल्यामुळे 21 विद्यार्थ्यांना विषबाधा (21 Students Poisoned)झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहा (loha)तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात (midday meal)विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये पाल आढळली. तोपर्यंत ही खिचडी 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली होती. त्या विद्यार्थ्यांनी खाल्ली. उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. उपचारानंतर आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.(nanded 21 students poisoned mid-day meal Zp School Kind of shocking)

Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट

खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेक विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ तसेच पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे 21 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बुद्रुक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

SBI मध्ये अकाउंट आहे? तर या सुविधांचा अवश्य लाभ घ्या, जाणून घ्या मोफत काय मिळते?

या घटनेमुळे गरीब विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन दिले जात असल्याचे समोर आले आहे. या मध्यान्ह भोजनामध्ये अनेकदा किडे, अळ्या असलेले धान्य वापरुन विद्यार्थ्यांसाठी आहार बनविला जात असल्याचे दिसून आले आहे.

नांदेडमध्ये अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यापूर्वी मध्यान्ह भोजनातून 56 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील शाळेत ही घटना घडली होती. खिचडी शिजवताना त्यात पाल पडली होती.

सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री. छञपती हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली होती. मात्र, खिचड़ी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या होत्या. तात्काळ विद्यार्थ्यांना बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Tags

follow us