“मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, फडणवीसांनी मला..”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Pratap Patil Chikhalikar : सध्याच्या परिस्थितीत मराठवाड्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. येथे काही नेत्यांमध्ये तर विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यातच आता चिखलीकरांनी गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) वेळी चिखलीकरांनी […]

Ashok Chavan

Ashok Chavan

Pratap Patil Chikhalikar : सध्याच्या परिस्थितीत मराठवाड्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. येथे काही नेत्यांमध्ये तर विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यातच आता चिखलीकरांनी गौप्यस्फोट केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) वेळी चिखलीकरांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळी नेमकी काय राजकीय समीकरणे होती याची माहिती त्यांच्याच एका वक्तव्यावरुन आता समोर आली आहे. मी स्वतःहून पक्ष सोडला नाही. एड्जस्टसाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना (2019) त्यांनी सांगितलं होतं की अशोकराव लीडर नाहीत डिलर आहेत. या वक्तव्याचीही चिखलीकर यांनी यावेळी आठवण करून दिली.

अहिल्यादेवींचं प्रशासन अन् देवाभाऊंची तयारी, अमित शाहांसमोर अशोक चव्हाणांचा विजयी शंखनाद

Exit mobile version