Download App

‘आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलंय’; जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या सभेत फोडली डरकाळी

Jitendra Awhad : आम्ही, चांगल्या चांगल्यांना छातीवर घेतलयं, आला अंगावर घेतलं छातीवर हा शरद पवार साहेबांचा नियम असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डरकाळी फोडली आहे. दरम्यान, बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

नगरकरांना भावल्या PM मोदींच्या योजना; विखे पाटलांनी वाचून दाखवली आकडेवारी

आमदार आव्हाड म्हणाले, बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा, गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे. गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावरील केस 15 दिवसांत नील केली होती. आज परिस्थिती काहीही असो, पण बीडच्या लढाईत आम्ही सगळे संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. तसेच चांगल्या चांगल्याना आम्ही छातीवर घेतलंय, आला अंगावर घेतलं छातीवर हा साहेबांचा नियम आणि त्याच साहेबांचे आम्ही शिष्य असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

फोटोवरून राजकारण तापलं; काका-पुतण्याच्या वादात राऊतांनी राज ठाकरेंनाही ओढलं

अजित पवार गटावर भाष्य :
अरे पळकुट्यानो तुम्ही बॅनरवर नावही लिहायचं होतं. एकीकडे साहेबांचा फोटो वापरायचा आणि दुसरीकडे साहेबांच्या नावाने दिशाभूल करायची. साहेब आमचं दैवत म्हणायचं दुसरीकडे दिशाभूल करतात. तुमची अशी डबल भूमिका चालणार नाही, तुम्हाला साहेबांनी काय नाही दिलं? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

‘नवीन मित्र आल्यानं ताकत वाढते’; अजितदादा-शरद पवारांच्या भेटीवर नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. अशातच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार-शरद पवारांच्या भेटीवरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर शरद पवार भाजपसोबत जाणार की काय? अशी चर्चा सुरु होती.

या चर्चेला अखेर खुद्द शरद पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. आम्ही विचारधारा बदलणार नसून भाजपसोबत जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यानंतर आज बीडमध्ये शरद पवार गटाच्यावतीने आज स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार डाव टाकत असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us