नगरकरांना भावल्या PM मोदींच्या योजना; विखे पाटलांनी वाचून दाखवली आकडेवारी
Radhakrishna Vikhe : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं. अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहेत, अशा शब्दांत विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
राज्य सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज शिर्डीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
फोटोवरून राजकारण तापलं; काका-पुतण्याच्या वादात राऊतांनी राज ठाकरेंनाही ओढलं
जिल्ह्यावर आज दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे काही निर्णय घेणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्यांनी चारा उत्पादन करावे आणि त्यांच्याकडून चारा सरकारने विकत घ्यावा. बियाणे आपण सरकार त्यांना मोफत देईल असे धोरण घेण्याची गरज आहे अशा शब्दांत चारा टंचाई कमी करण्याचा उपाय विखे यांनी सांगितला.
विखे पुढे म्हणाले, यावर्षी नगर जिल्ह्यात पाच पट शेतकऱ्यांनी विमा घेतला. मागच्या वेळी 2 लाख होते यावर्षी 11 लाख शेतकऱ्यांनी विमा घेतला. एक रुपयात पीक विमा योजनेचे हे यश आहे. लम्पी आजारात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले. शंभर कोटी रुपये नुकसान भरपाई पशुपालकांना दिली. केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम संपणार नाही. तर पुढील टप्प्यात तालु्क्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधण्याचे काम सरकार करणार असल्याचे विखे म्हणाले.
Shasan Aaplya Dari : तुमच्या नौटंकीसाठी नागरिकांचे हाल का? तनपुरेंचा सवाल
जेवण करा, जाताना जांभळाचे रोप घेऊन जा
शासन आपल्या दारी योजनेतील लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांनी जेवण करा आणि जाताना जांभळाचे रोप घेऊन जा. काही दिवसांनी आम्ही घरी घरी येऊन जांभळाच्या झाडाचे काय केले हे पाहणार आहोत. सरकारने तुम्हाला दिलेली ही भेट आहे, असे विखे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना सांगितले.