OBC Leader Navnath Waghmare : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांची स्कॉर्पिओ गाडी जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचीच माहिती समोर येत आहे. तिरुखे याने नवनाथ वाघमारे यांची गाडी पार्किंगमध्ये उभी असताना जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी जालना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याला अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला जामीन मंजूर झालायं.
शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार! 33 वर्षांच्या कारकिर्दीतील पहिला सन्मान
जालना येथे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची दोन दिवसापूर्वी घरासमोरील स्कार्पिओ जाळण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मनोज जरांगे यांचा सहकारी असलेला विश्वंभर तिरुखे याला या प्रकरणांमध्ये अटक केलं. कालपासून फरार असलेल्या विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथे जालना पोलिसांनी अटक केलं, याप्रकरणी तिरुखे याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची रक्कम जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
विश्वंभर तिरुखे हा मनोज जरांगे याच्या अत्यंत निकटवर्तीय असून नारायण गडावर दोघांनाही एकच माळ घालण्यात आली होती. यासंदर्भात माझ्याकडे फोटो आहेत. तर दुसरीकडे तिरुखे हा माझा मेहुणा असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. तिरुखे हा मराठा आणि मी माळी आहे. त्याची बहीण मला देण्यात आलीयं का? मग तो माझा मेहुणा कसा. त्याला आता पोलिसांनी अटक केलीयं. सोशल मीडियावरच्या पिलावळांनी आता उत्तर द्यावं, असं आव्हान वाघमारेंनी दिलंय.
या प्रकरणी नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावरती आरोप करत तिरुपे मनोज जरांगे यांचा अत्यंत जवळचा आणि निकटवर्ती असून त्याचे करते करविते जरांगेच असल्याचं सांगत म्हणून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीयं. तर आपण असले धंदे करत नाही , जे करायचं ते आपण समोरासमोर करतो असं प्रत्युत्तर देत मनोज जरांगे यांनी आरोप फेटाळून लावले होते.
धाराशिवमध्ये ढगफुटी! खासदार ओमराजे निंबाळकरांनी स्वत: पाण्यात उतरून लोकांना वाचवलं
शहरातील निलमनगर भागात ही घटना घडली होती. दरम्यान ही सर्व घटना पार्किंग मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला होता.दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही गाडी जरांगे समर्थक असलेल्या विश्वंभर तिरुखे याने जाळल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी आज तिरुखे याला अटक केली होती.
दरम्यान, अँड. गुणरत्न सदावर्ते दोन दिवसांपूर्वी जालन्यात येत असताना शहरातील नागेवाडी टोलनाक्याजवळ तिरुखे याने सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेनंतर देखील पोलिसांनी तिरुखे याला नजर कैदेत ठेवलं होतं.दरम्यान ज्या दिवशी सदावर्ते यांच्या गाडीवर तिरुखे याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी रात्री त्याने वाघमारे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.