Chhagan Bhujbal : पोलिसांवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला, त्यांना जखमी केलं. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीहल्ला करावा लागला पण दोशी नावाच्या एसपीने खरं कारण सांगितले नाही. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं की तुमच्याकडे पोलीस खातं आहे, खरी माहिती उपलब्ध आहे. पण राज्याच्या पुढे खरं चित्र आलं नाही. उलटं पोलीस अधिकारी निलंबीत केले, होम मिनिस्टरच माफी मागू लागला, गुन्हे मागे घेऊ म्हणू लागला, त्यामुळे पोलिसांचं मनोबल खचलं, असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला.
जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.
‘लेकरांचं नाव घेऊन लहान भावाच्या ताटातलं काढाल तर..’; वडेट्टीवारांचा जरांगेंना थेट इशारा
ते पुढं म्हणाले की लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.त्याला सांगितलं शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाळे हे सांगितलं नाही, अशी टीका भुजबळांनी केली.
OBC Reservation : ..तर महाराष्ट्र पेटून उठेल; ‘ओबीसी’ एल्गार सभेत पडळकरांचा इशारा
कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो पण तुझे खातो काय रे? असं म्हणत भुजबळांनी जरांगेवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला.