Download App

लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले

Chhagan Bhujbal : लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. आमचे राजेश टोपे (Rajesh Tope) साहेब आणि छोटे साहेब रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याला पहाटे तीन वाजता परत आणून बसवले.त्याला सांगितलं शरद पवारसाहेब येणार आहेत. शरद पवारांना (Sharad Pawar) लाठीचार्ज का झाला, पोलिसांवर हल्ले कसे झाले हे सांगितलं नाही, असा हल्लाबोल ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

ते पुढं म्हणाले की आमच्या राज्यकर्त्यांना काय सांगायचं, एक दिवस आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की पोलिसांी लाठीचार्ज केला. महिला पोलिसांवर हल्ला झाला मग करायंच काय? आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे? असा सवाल त्यांनी केला.

जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर आदी नेते उपस्थित होते.

‘आता भुजबळांचं वय झालं, भान ठेऊन…’, भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर

भुजबळ म्हणाले, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिंदे गटाच्या नेत्या गोऱ्हे असतील, त्या महिला पोलिसांच्या घरी जा. तुम्हाला आम्ही पत्ते देतो. त्यांच्यावर काय बितली ते त्यांच्याकडून वधवून घ्या. काय झालं ते तुम्हाला सांगतील.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला देखील आई म्हणून परत पाठवलं. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला? असा घणाघात छगन भुजबळांनी केला.

मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!

मराठा तरुणांची आज सहानुभूती गेली नसती. राज्याच्या देशाच्या पुढे खरं चित्र आलं नाही. उलट पोलिसांना सस्पेंड केलं. होम मिनिस्टरनेच माफी मागितली. गुन्हे मागे घेतले. किती लांगुलचालन करायचं? पोलीसही विचार करायला लागले. अरे आम्ही काही करायला लागलो तर आमच्यावर कारवाई. त्यामुळे जाऊद्या बीडमध्ये जे व्हायचंय ते होऊद्या, असे भुजबळ म्हणाले.

Tags

follow us