मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार, भूमिका जाहीर करताना काय म्हणाले?

धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे.

News Photo   2026 06 21T193407.482

सर्वात मोठी बातमी! माघार नाहीच..., ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात जाणार

मोठी बातमी समोर आली आहे. (Nimbalkar) धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. तसंच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

ओमराजे निंबाळकर बैठकी म्हणाले, आपल्याला लोकांची कामं करण्यासाठी निधी लागेल. आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारावं लागेल. आपला निकाल आला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. निकाल लावण्यासाठी गेलो असं लोक म्हणतात. मग मी 22 तारखेलाच गेलो असतो ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. साध्यासाध्या कार्यकर्त्यांच्या कामालाही अडचणी येत आहेत. मी काही निर्णय घेणार आहे. या निर्णयाच्या पाठिशी तुम्ही राहा असंही ते म्हणाले.

ऑपरेशन टायगर कधीपासून शिजत होतं?, पक्षांतर करणाऱ्यांच्या मुलांवर विश्वास ठेवणार का?, सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

ओमराजे काय म्हणाले?

माझे वडिल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल माझ्या विरोधात गेल्यानंतर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडमवीस यांचा फोन आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोन आला. त्यांनी माझं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणं करून दिलं असं म्हणत ओमराजे यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्याचबरोबर मी कोणत्याही दबावात येऊन शिंदे यांच्या शिवसेनेत जात नाही. माझ्यामागं कोणतीही ईडी सीबीआय चौकशी नाही. माझा कोणताही व्यवसाय नाही जो वाचवण्यासाठी मी सत्ताधाऱ्यांकडं चाललोय. असं कुठलही कारण नाही ज्यामुळं मला जावं लागत आहे. परंतु, लोकांची काम करायची आहेत. साध लाईट डीपीचा घोटाळा झाला तरी लोक फोन करतात. आपण मदत करू शकत नाहीत ही मोठी कुचंबना आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले आहेत.

Exit mobile version