Pankaja Munde : सावरगाव येथील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. येथील दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केल. उन्हातान्हात सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. पंकजा मुंडे भाषण करत असताना उपस्थित कार्यकर्ते उत्साहाच्या भरता सीएम, सीएम अशा घोषणा देत होते. त्याचवेळी पंकजा मुंडे यांच्या माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. माईकची वायर कुणीतरी कट केला. यानंतर पंकजा मुंडे खोचक शब्दांत म्हणाल्या की सभेत कुणीतरी फुटलं आहे आणि त्यानेच वायर कट केली असेल पण, माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले.
…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
भ्रष्टाचाऱ्यांना पाडणार म्हणजे पाडणारच
यानंतर पंकजा मुंडे उपस्थितांना म्हणाल्या, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता मैदानात उतरणार आहे. मी आता भ्रष्टाचाऱ्यांना पाडणार म्हणजे पाडणारच. ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवा पुढल्या दसरा मेळाव्याला मी तोंड दाखवणार नाही. मी नीतीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. तु्म्ही पैसे जमा केले तेव्हा मला कळाले की बँकांची नाही तर मी तुमची कर्जदार आहे. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्याबद्दल मी तुमची माफी मागते. लोकांची माफी मागितली. काहींना पद प्रतिष्ठा मिळते, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, असे पंकजा म्हणाल्या.
लोकांना सरकारकडून खूप अपेक्षा
मी लोकांना फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझ्या कारखान्यासाठी लोकांनी दोन दिवसांत 11 कोटी रुपये जमा केले आहे. मात्र मी मुलाला सांगितले मी या लोकांचे पैसे नाही तर त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळेच माझ्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं’; जाहिरातीबाजीवरुन वडेट्टीवारांनी सरकारला फटकारलं
मला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधणार
काम करत असताना निवडणुकीत मी पडले. राजकारणात माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावं लागतं. मला माझ्या लोकांना कुबड्या दिल्या आणि आता मी मॅरेथॉन धावण्यासाठी तयार झाले आहे. ज्यांना पद, प्रतिष्ठा मान मिळतो त्यांचं भागतं. दरवेळी तु्मचा अपेक्षाभंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा. नीतिमत्ता गहाण ठेऊ शकत नाही. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.