Chandrashekhar Bawankule : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत राजकीय भूकंप घडवला होता. शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकवले. अजित पवार सध्या राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. यानंतर काँग्रेसमध्येही अशीच फूट पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडणार असे वक्तव्य केले होते. काँग्रेसचं घर फुटणार हे मी वारंवार सांगतोय असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रया दिली आहे.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना आमदार शिरसाट यांनी केलेल्या दाव्याबद्दल विचारले. त्यावर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले, पक्षप्रवेशासाठी आम्ही कोणाच्याही घरी जाणार नाही. कुठलाही गट आणण्यासाठी आम्ही कुठेही जाणार नाही. परंतु, कुणी जर आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार आहे.
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून विरोधी पक्षांकडील विरोधी पक्षनेते पद रिकामे आहे. सध्याच्या अधिवेशनातही विरोधी पक्षनेत्याशिवायच महाविकास आघाडीचे सभागृहात येत आहेत. सध्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित आहे. मात्र तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड करता आलेली नाही. काल सभागृहात याच मुद्द्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांच्यात चांगलेच वाद झाले. विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर बावनकुळे यांनी भाष्य केले.
वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक
ते म्हणाले, 2024 पर्यंत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरणार नाही. कारण, इतका संशय आणि इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसची झाली आहे की त्यांना विरोधी पक्षनेता बनवण्याची भीती वाटत आहे.