Download App

Prakash Ambedkar : ‘वंचित’ ने जाहीर केला इंडिया आघाडीसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला

Image Credit: letsupp

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत (INDIA Alliacne) समावेश झाला तर अशा स्थितीत चारही पक्ष समसमान जागा वाटप करतील असे ठरले. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. वंचितने लोकसभेच्या 12 जागाची मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आंबेडकर यांनी वेळोवेळी सूचित केले की आपण इंडिया आघाडीचा भाग बनण्यास तयार आहोत. मात्र आजपर्यंत त्यांना याचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले नाही. पाटणा आणि बंगळुरूनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत झाली तेव्हा त्यांना बोलावणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याचे पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा न झाल्यास 50-50 च्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे गटासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.

भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…

खरे तर इंडिया आघाडी स्थापन होण्यापूर्वी गेल्या वर्षी राज्यात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात युती होती, ती आजही कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहमती दर्शवल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळेल अशी आशा होती, मात्र तसे झालेले नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर एकटे लढले तर राज्यातील दलित आणि मागासवर्गीय महाविकास आघाडीवर नाराज होऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांबाबत संयम बाळगत आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले आहे की प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत समाविष्ट करावे. पण प्रत्येक पक्ष स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.

मोठी बातमी; नवाब मलिक अचानक अजितदादांच्या भेटीला, ‘देवगिरी’वर खलबतं

वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. त्यांच्याशी आमची चर्चा सकारात्मक सुरूच आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते लवकरच चर्चेला बसू पण काँग्रेसचा स्थापना दिवस 28 तारखेला आहे, त्यामुळे 28 तारखेनंतर निर्णायक बैठक होऊ शकते. लोकशाहीला हानी पोहोचेल असा कोणताही निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत, अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज