राम मंदिर लोकार्पणाला गिरीश महाजन जाणार का? ठाकरे गटाचा खोचक सवाल

राम मंदिर लोकार्पणाला गिरीश महाजन जाणार का? ठाकरे गटाचा खोचक सवाल

Sachin Ahir अयोद्धेतील राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. त्या सोहळ्याला व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण दिलं जाणार आहे. सरकारच्या दृष्टीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे व्हीव्हीआयपी नसतील त्यामुळे त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नसल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावरुन आता ठाकरे गटाकडून परखड शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

भारतीय जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; संरक्षणमंत्र्यांचा इशारा

यावेळी सचिन अहिर म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रण कोणाला द्यायचं? कोणाला नाही द्यायचं हा त्यांचा मुद्दा आहे. गिरीश महाजन बोलले की, व्हीव्हीआयपी लोकांनाच निमंत्रण दिलं जाणार आहे. ज्या पोटतिडकीने महाजन त्यांची बाजू मांडत आहेत, ते या कार्यक्रमाला जाणार आहेत का? ते त्यांनाच विचारा असाही सवाल यावेळी अहिर यांनी केला आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का! एसटी बँकेच्या 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

ज्यांना लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani)यांची आठवण होत नाही. ज्यांना विश्व हिंदू परिषदेची (Vishwa Hindu Parishad)आठवण होत नाही, त्यांच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची? असा थेट सवाल ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार सचिन अहिर Sachin Ahirयांनी उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाचं निमंत्रण येऊ किंवा न येऊ तो आमच्यासाठी आस्थेचा विषय असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचवेळी जे सांगत आहेत की, त्यांच्या छाताडावर बसून आम्ही राम मंदिर बांधलं, त्यांची 56 इंचाची छाती कुठे होती असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.

पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, विरोधकांच्या छाताडावर बसून राम मंदिरही बांधलं आणि लोकार्पणाची तारीख देखील सांगितली. त्यावरुन आज ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी फडणवीसांना खोचक सवाल केला आहे.

अयोद्धेतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाला मिळणार की नाही? यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर आता ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाबरी मस्जिद पाडली त्यावेळी भाजपने पळपुट्याची भूमिका घेतली.

अहिर म्हणाले की, ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडली होती, तेव्हा पुढे येऊन सांगण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यावेळी हे छाताडावर बसून राम मंदिर बांधणारी 56 इंचाची छाती कुठे होती असा खोचक सवाल यावेळी त्यांनी केला आहे.

त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी परखड भूमिका घेत हे काम जर आमच्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला अभिमान आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. हे सांगण्याचं धाडस तुमच्या राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये आहे का? असाही सवाल यावेळी त्यांनी केला.

त्यामुळे जे चांगलं काम होत आहे त्याला एक इव्हेंट न करता हा देशाचा स्वाभिमान आहे. ही देशाची आस्था आहे. त्या आस्थेला राजकीय वळण देण्याचं काम होत आहे. तसेच सातत्यानं ठाकरे गटाचं खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube