Pratap Sarnaik : राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते, खुर्चीची नेहमीच अलाबदल होत असते या शब्दांत शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तानाजी सावंतांना सुनावलंय. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याचं चित्र आहे. अशातच पालकमंत्रिपदी विराजमान होताच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलीयं. या बैठकीला तानाजी सावंतांनी दांडी मारलीयं. त्यावरुन सरनाईकांनी ही टोलेबाजी केल्याचं दिसून येतंय.
बजेटपूर्वीच सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा, 1 एप्रिलपासून लागू होणार UPS योजना
पालकमंत्री प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले, खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते. या खुर्चीची नेहमीच आदलाबदल होत असते.’ असे सांगत त्यांनी यावेळी योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.. याबाबत सावंत यांच्याशी आपलं काहीही बोलणं झाले नसल्याचं सरनाईकांनी स्पष्ट केलंय.
सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा
तसेच सरनाईक यांनी पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून यांनी मोठे निर्णय घेतले. त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांनी शनिवारी धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन ५० लालपरी देण्याची घोषणा केली. त्यांनी पहिल्याच दौऱ्यात केलेल्या या मदतीच्या घोषणेतून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी दिली.
लोकलची हार्बर अन् पश्चिम मार्गावरील वाहतूक खोळंबली; ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
सटीची भाडेवाढ झाली असली तरी आता चांगल्या सुधारणाही देण्याचा प्रयत्न असणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बस दाखल होतात. पुढील पाच वर्षात एकूण 25 हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बसगाड्या देत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.