मंत्रिमंडळातून पत्ता कट; माजी मंत्री तानाजी सावंतांनी डीपी बदलला, नव्या पिक्चरवर कोण?

Mla Tanaji Sawant : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) राज्यात घवघवीत यश मिळवलेल्या भाजप पक्षासह महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केलीयं. सत्ता स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या गोपनियतेची शपथही महायुतीच्या नेत्यांनी घेतलीयं. यामध्ये भाजपमधील 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिवेसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांना राज्यपालांनी गोपनियतेची शपथ दिलीयं. मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना स्थान न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. त्याचीच प्रचिती म्हणून शिवेसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरील प्रोफाईल पिक्चर बदलून नवीन प्रोफाईल पिक्चर पोस्ट केलायं. सावंतांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
तत्कालीन महायुती सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांवर आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. मंत्रिपदाच्या माध्यमातून सावंत यांनी राज्यभरात आरोग्यासंबंधित विविध योजना राबवून आपल्या विकासकामांचा ठसा उमटविला होता. यासोबतच राजकीय वर्तुळात टीका-टिप्पण्या करीत ते नेहमीच चर्चेत असत. मात्र, यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान न मिळाल्याने सावंतांनी आपला पूर्वीचा प्रोफाईल पिक्चर बदलून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करीत शिवसैनिक असा उल्लेख केलायं. तर आधीच्या पिक्चरमध्ये तानाजी सावंत यांचा स्वत:चा फोटो आणि धनुष्यबाण चिन्ह होतं.
तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वीच हा फोटो बदलला असून त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची नाराजीतूनच ही कृती केली असावी, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीयं. ओबीसी नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनाही मंत्रिपदातून वगळण्यात आल्याने या मुद्द्यावरुन राज्यात टीकेचा सूर आवळण्यात येतोयं. अशातच आता तानाजी सावंतांचीही नाराजगी समोर आल्याने एकच चर्चा सुरु झालीयं.
Video : हो, मी नाराज; मला डावललं काय अन् फेकलं काय? भुजबळांच्या मनातलं अखेर बाहेर आलचं
शिंदेंनी शब्द फिरवला…
विधानसभा निवडणुकीदरम्यान खुद्द एकनाथ शिंदे यांनीच भर सभेत तुम्ही तानाजी सावंतांना आमदार करा मी नामदार करतो, अशी जाहीरपणे घोषणा केली होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी तानाजी सावंत समर्थकांकडून लावून धरण्यात येत आहे. तसेच मंत्रिपदातून वगळल्याने सावंत समर्थकांनी आज परांड्यात आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केल्याचं दिसून आलंय.
दरम्यान, विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून या अधिवेशनाकडेही सावंत यांनी पाठ फिरवलीयं. तसेच, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही ते अनुपस्थितीत होते. नागपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येच त्यांनी आपली बॅग पॅक केल्याचं काल दिसून आलं. त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत.