पालकमंत्री तानाजी सावंत यांची संवेदनशीलता; ताफा थांबवून धावून गेले अपघातग्रस्तांच्या मदतीला!
Tanajirao Sawant : विधानसभेच्या निवडणुकीचा (Vidhansabha Election) प्रचार शिगेला पोहोचला असताना, प्रचार दौर्यात व्यस्त असलेले धाराशिवचे पालकमंत्री तथा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत (Tanajirao Sawant) यांच्यातील संवेदनशील नेतृत्व आज पुन्हा एकदा दिसून आले. भूम दौर्यावर असताना त्यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हे अपघाताचे दृश्य पाहताच सावंत यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघातग्रस्तांच्या दिशेने धाव घेतली.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी
तानाजी सावंत आज भूम दौर्यावर असतांना त्यांच्या समोर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. हा दुचाकीस्वार आणि त्याचे कुटुंबीय रस्त्यावर पडलेले पाहून, तानाजीराव सावंत यांनी तातडीने आपला ताफा थांबवून मदत आणि बचाव कार्य सुरू केले. सावंत यांनी जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवले आहे. एवढेच नाही तर जखमींना आधार देत, काळजी करू नका, काही होणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर देखील त्यांनी दिला.
प्रा. डॉ. सावंत यांची ही संवेदनशीलता पाहून जखमींसह घटनास्थळी उपस्थित सर्वांनाच गहीवरून आले होते. नेता असावा तर असा, अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.