एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बूस्ट; तानाजी सावंतांनी पक्षात आणली तरुणांची फळी

Tanaji Sawant Election Campaign : परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी (Tanajirao Sawant) मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे. नागरिकांच्या भेटी, गावांचे दौरे आणि चौकसभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. तानाजीराव सावंत मतदारसंघातील गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. वाशी तालुक्यातील तेरखेडा आणि खानापूर गावातील नागरिकांशी संवाद साधला. येथे चौकसभाही घेण्यात आली. यावेळी डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या ५ वर्षात केले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत. संवाद दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले व सावंत साहेबांच्या विजयचा निर्धार देखील व्यक्त केला.

साखर कारखाना, दूध संघ अन् पाणी.. तानाजी सावंतांनी भविष्यातील प्रोजेक्टच मांडला

दरम्यान, परंडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ. परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांत तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचे अस्त्र. याच अस्त्राच्या जोरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी आपला प्रभाव तयार केला होता. या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचे नेतृत्व उभे केले आणि घडवले.

सन 1985 आणि 1990 असे सलग दोनवेळा ते आमदार झाले. 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. सन 1995 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला होता.

तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदारसंघाचे आमदार आहेत. यंदा शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. सावंत यांचा जन्म १ जून १९६४ रोजी माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) वाकाव येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पीएचडी देखील पूर्ण केली. प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं.

तानाजी सावंतांचा संवाद दौरा; प्रचारातून दिला विकासाचा शब्द

follow us
  • fb
  • instagram
  • youtube