Raj Thackeray : जालन्यात आंदोलकांना ‘राज’ बळ; लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना वेशीवरच रोखा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि. 4) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ दिले. आंदोलकांवर आमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असे आदेश राज यांनी दिले आहेत. राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात असून, ते […]

Letsupp Image   2023 09 04T115654.559

Letsupp Image 2023 09 04T115654.559

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि. 4) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ दिले. आंदोलकांवर आमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका असे आदेश राज यांनी दिले आहेत. राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात असून, ते फक्त आरक्षण आणि पुतळ्याचं राजकारण करतात त्यांच्या नादी लागू नका असेही राज यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले. (Jalna Maratha Protest News Update )

महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

फडणवीसांचे टोचले कान

यावेळी राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे कान टोचत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काल (दि. 3) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याचं राजकारण करू नका असे विधान केले आहे. त्यावर राज यांनी फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर, काय केलं असतं असा उलटप्रश्न उपस्थित करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

लाठीहल्ल्याचे दोषी पोलीस नाही – राज ठाकरे 

यावेळी त्यांनी आंदोलकांवर आमानुषपणे लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांना दोषी धरू नका. तर, त्यांना आदेश देणाऱ्यांना दोषी धरा असे म्हणत हेच आदेश देणारे सत्तेत असताना गोळ्या झाडतात आणि विरोधात असताना मोर्चे काढतात. त्यामुळे या नेत्यांच्या नादाला लागू नका असा सल्ला राज यांनी यावेळी आंदोलकांना दिला. तसेच या मुद्द्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची चर्चा करू असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.

सलग तिसऱ्या दिवशी अजितदादा कार्यक्रमांना गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

आरक्षणाचा तिढा कोर्टात आहे. काही गोष्टी कायद्याच्या बाजूने समजून घेणे आवश्यक आहे. मला इतर नेत्यांसारखं खोटं बोलता येत नाही. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांसाठी स्वतःचा जीव गमावू नका असेही राज यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले. हे सगळे राजकारणी लोक तुमचा फायदा करुन घेत आहेत. चांगली मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हे कधी सतत तुम्हाला जातीचं आणि आरक्षणाचं आमीष दाखवून कधी सत्तेत तर कधी विरोधात येतात. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमच्यावर प्रेम असतं आणि सत्तेत गेल्यावर मारायला उठतात.

शासन आपल्या दारी कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह 

जालन्यात येत्या 8 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सराटी गावातील घटनेनंतर राज्य शासनाकडून हा कर्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, आता हा कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येण्यापासून रोखा असे आदेश आंदोलकांना दिले आहेत. त्यामुळे येत्या 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती परिक्रमा दौरा; असा असणार संपूर्ण दौरा

शिंदे-फडणवीसांची घटनास्थळाला भेट नाही 

सराटी गावातील घटनेनंतर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील घटनास्थळावर जाऊन परिस्थिती जाणून घेतली आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यपपर्यंत घटनास्थळाला भेट दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version