Download App

आधी सत्कार नंतर थेट काळे फासत विचारला जाब; जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणं तारख यांना भोवलं

Ramesh Tarakh यांच्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. जरांगे यांना विरोध केल्याने झुंजार छावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फसलं

Ramesh Tarakh face smear black who Oppose to Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून गेल्या दहा महिन्यांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना विरोध करणाऱ्या डॉ. रमेश तारख (Ramesh Tarakh ) यांच्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे तारख यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झुंजार छावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फसलं (face smear black ) आहे.

एनडीए सरकार बॅकफुटवर का? राहुल गांधींनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केलं

छत्रपती संभाजीनगरमध्ये तारख यांना गाठत या संतप्त कार्यकर्त्यांनी अगोदर गांधीगिरी केली. त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर थेट त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात आले तसेच त्यांना मनोज जरांगे यांना विरोध केल्याबद्दल जाब विचारण्यात आला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

1 लाख रुपये वेतन, बंगला, कारसह ‘या’ सुविधांचा लाभ घेणार राज्यातील 33 खासदार

दरम्यान मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधील उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामध्ये जरांगे पाटील यांचे सहकारीच असलेले डॉ. रमेश तारख, किरण तारख सह अन्य गावकऱ्यांचा उपोषणाला विरोध होता. त्यासाठी त्यांनी जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे केली होती.

यूपी-बिहारसारखाच हिंसाचार राज्यात सुरू होईल, मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील वातावरण सुरक्षित नसून जातीय सलोखा ही बिघडलाय. या जातीय तेढातून भांडणे होऊन, कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जरांगे पाटीलांच्या उपोषणाला परवानगी देवू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

https://youtu.be/3pVCdgjlM3A?si=Ws34N3EfD_2LNcAx

त्याचाच राग मनात ठेवून या या संतप्त कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये तारख यांना गाठत थेट त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात आले तसेच त्यांना मनोज जरांगे यांना विरोध केल्याबद्दल जाब विचारला आहे.

follow us