1 लाख रुपये वेतन, बंगला, कारसह ‘या’ सुविधांचा लाभ घेणार राज्यातील 33 खासदार
Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Result 2024) देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार (NDA Government) स्थापन झाले असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. तर आता आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला (Lok Sabha Session 2024) सुरुवात होणार आहे.
संसदेत आज पाहिल्या दिवशी सर्व सदस्यांचे शपथविधी होणार आहे. यावेळी 543 पैकी तब्बल 280 खासदार पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य होत आहे. पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? या खासदारांना कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात.
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
लोकसभा खासदारांना वेतनासह अनेक भत्ते देण्यात येतात तसेच प्रवासाच्या सुविधा, आरोग्य सुविधा, निवासस्थान, टेलिफोन आणि पेन्शन या सारख्या सुविधा देण्यात येतात. माहितीनुसार, खासदारांना 1 लाख रुपये वेतन मिळतो तर घरी होणाऱ्या बैठकीसाठी 2 हजार रुपयांचे भत्ते मिळते. याच बरोबर खासदारांना संसदेच्या अधिवेशन, समितीच्या बैठकांना हजार राहण्यासाठी प्रवास सुविधा देण्यात येतात तसेच जर खासदार अधिवेशनाला 15 दिवस उपस्थित राहिले तर त्यास प्रवास खर्च देखील दिला जातो.
प्रवासासाठी खासदारांना रेल्वेच्या फर्स्ट क्लास कोचमधून फ्री प्रवास मिळतो याच बरोबर खासदारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील प्रवास खर्चात सूट मिळते. तसेच खासदारांना त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी देखील पैसे मिळतात.
तर दुसरीकडे खासदारांना टोलमध्ये देखील सवलत मिळते. त्यांना दोन फास्टग देण्यात येतात एक दिल्लीसाठी तर एक त्यांच्या मतदारसंघासाठी. तसेच खासदारांना 1 लाख रुपये वेतन, त्यांच्या मतदारसंघासाठी 70 हजार रुपये भत्ता, कार्यालयीन खर्चासाठी 60 हजार रुपये आणि दैनिक भत्ता देखील दिला जातो. तसेच निवृत्तीनंतर माजी खासदारांना 22 हजार रुपये दरमहा दिले जातात.
कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे जात मरेल शहाणे व्हा; जरांगेंचं विखेंना जोरदार प्रत्युत्तर