Download App

अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर, जालना आणि बीडमध्ये नो एंट्री

  • Written By: Last Updated:

Rishikesh Bedre : अंतरवली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे (Rishikesh Bedre) याला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

Winter Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन नाही तर, फोटोसेशन गाजलं; पाहा फोटो 

अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. आंदोलना दरम्यान, त्यांची तब्येत खालावल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात यावं यासाठी राज्यशासन प्रयत्नशील होतं. मात्र, आंदोलक ऐकत नसल्यानं जालना पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचाही वापर केला. दरम्यान, यावेळी दगडफेकही झाली होती. या घटनेत पोलिसांसह अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेद्रे याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात कलम ३०७ व इतर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ज्ञानवापी मशीद आणि शाही ईदगाह प्रकरण किती वर्ष जुनं? वादाची संपूर्ण कहाणी…

ऋषिकेशकडे गावठी कट्टा आणि काडतुसे साडल्याचा देखील आरोप करण्यात आला. अंतरवली सराटीतील जाळपोळीशी ऋषिकेशचं असलेलं कनेक्शन या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ झाला होता.

ऋषिकेश बेद्रेला अटक झाल्यानंतर त्याने अंबड सत्र न्यायालयाने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अॅड. विशाल कदम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती एस. व्ही. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील व्ही.डी. सपकाळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन मंजूर केला. अटी शर्थीच्या आधारावर बेद्रे याचा जामीन मंजूर करण्यात आला. ऋषिकेशला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर व तीन महिने बीडसह जालना जिल्यात प्रवेश न कऱण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर झाला आहे.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज